- Home
- /
- राज्य
- /
- महाराष्ट्र
- /
- 'होटल मालिक ने अपने ही...
x
नासिक न्यूज़: 'अचलपूर शहरातील देवळी चौक येथील दुर्गा हॉटेलचे संचालक सूरज रावत यांनी आज, मंगळवार २५ जुलैला सायंकाळी गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेने एकच खळबळ उडाली असून व्यापारीवर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.
अचलपूर शहरातील दुर्गा हॉटेल हे सर्वांचे परिचित असून संचालक सूरज रावत हे नेहमी ग्राहकांना सौजन्यपूर्ण वागणुक देत होते. नव्हे याच गुणामुळे ते सर्वांचे लाडके व सुपरिचित होते. त्यांनी आत्महत्या का केली याचे कारण मात्र अद्यापही कळू शकले नसुन पोलीसांनी आकस्मीक मृत्यूचा गुन्हा दाखल करत चौकशी प्रारंभ केली आहे. सूरज रावत यांच्या पश्चात बराच मोठा आप्त परिवार आहे. या घटनेने अचलपूर शहरात सर्वत्र शोक संवदेना व्यक्त केल्या जात आहे
Next Story