- Home
- /
- लाइफ स्टाइल
- /
- उम्र बढ़ने के साथ जवान...
लाइफ स्टाइल
उम्र बढ़ने के साथ जवान होती जा रही हैं श्रद्धा कपूर, टीचभर पैंट में किया ऐसा डांस
Manish Sahu
6 Aug 2023 3:03 PM GMT

x
लाइफस्टाइल: बॉलीवूडमधील सर्वात क्युट अभिनेत्रींपैकी एक म्हणजे होय. जिच्याकडे पाहून अजिबात तिच्या खऱ्या वयाचा अंदाज लावता येत नाही. कारण ती अशा अशा लुक्समध्ये समोर येते की तिला पाहून वाटते की जणू ती 25-26 वर्षांचीच आहे. पण खरे तर श्रद्धा कपूर ही च्या वयाची आहे. काय? बसला ना धक्का? श्रद्धा कपूर चक्क 36 वर्षांची आहे, पण कोणत्याच अँगलने तिचे वय एवढे दिसत नाही.
उलट ती या वयातही कॉलेज गोईंग क्युट गर्ल दिसते. त्यात तिला स्वत:ला स्टाईल आणि फॅशनचा इतका जबरदस्त सेन्स आहे की तिच्यासमोर भल्या भल्या सौंदर्यवती फिक्या वाटतात. श्रद्धाचा असाच एक गोष्ट एयरपोर्ट लुक समोर आला आहे, ज्यात शॉर्ट्स आणि टाइट टॉपमध्ये ड्रेस्ड असलेली ही ललना आपल्या स्मित हास्याने अगदी कलेजा खल्लास करते आहे.
यावेळी श्रद्धा कपूरने असे कपडे परिधान केले होते, जे कॉलेज गोइंग मुलींमध्ये लोकप्रिय आहेत. श्रद्धाने पांढऱ्या रंगाची स्मार्ट दिसणारी शॉर्ट्स परिधान केली होती, जी लिनेनची होती. त्याची डिजाइन फॉर्मल टचची होती. शिवाय श्रद्धाने त्याच रंगाचा फुल स्लीव्ह टॉप पेअर केला.
श्रद्धाचा फिटिड टॉप आणि लहान शॉर्ट्स तिच्या फिट आणि स्लिम फिगरला जबरदस्त हायलाइट करत होते. नेहमी फिट दिसणाऱ्या अभिनेत्रींमध्ये श्रध्दा कपूर या नावाचा समावेश आवर्जून असतो आणि हा लूकही तिचा फिटनेस एनहान्स करण्याचेच काम करत होता.
सहसा सर्वच अभिनेत्री लक्झरी लेबलच्या बॅग घेऊन जाताना दिसतात, परंतु श्रद्धा तिच्या खांद्यावर पांढर्या रंगाची सुंदर वर्क बॅग कॅरी करून जाताना दिसली. तिच्या एअरपोर्ट लूकला ही बॅग म्हणजे एक रिफ्रेशिंग टच होता.
कॉलेज गोइंग तरुणीसारखे छोटे केस, कपडे आणि शूज, या स्टाईलमध्ये यंग गर्ल दिसणाऱ्या श्रद्धा कपूरने यावेळी सर्वांनाच घायाळ केले. तिच्या भेटीसाठी उभ्या असणाऱ्या एका चाहत्याने तिला सगळ्यांसमोरच गुलाबाचा पुष्पगुच्छ दिला आणि तो घेताना श्रद्धा इतकी गोड हसली की तिचे सौंदर्य अधिक जास्त खुलले.
फॅशन डिझायनर राहुल मिश्रासाठी श्रद्धाने रॅम्प वॉक केला. तिने हेवी डिझायनर ब्रायडल सिल्व्हर लेहेंगा घातला होता. त्यावर गुलाबी नक्षीकाम केलेले डिझाइन होते. यासोबतच तिने लो कट नेकलाईन असलेला अत्यंत हॉट मजेस्टिक असा ब्लाऊज घातला होता. या लुकमध्ये तिने छोटेसे केस मोकळे सोडले होते आणि ग्लॉसी मेकअपमध्ये श्रद्धा खूपच सुंदर दिसत होती. सिल्वर चोकर गळ्यात घालून तिने हा लुक कम्प्लिट केला होता.
Next Story