नासिक: पाथर्डी फाटा येथील ८० वर्षांच्या गर्ग या घरी एकट्याच असताना त्यांना फोन आला. तुमच्या पतीला परदेशातील रॉयल आर्यलॅण्ड बँकेकडून ४ कोटी ३८ लाखांची लॉटरी लागली आहे. ती रक्कम मिळविण्यासाठी ४ टक्के रक्कम भरा. आजींनीही वेळोवेळी ४ लाख ३८ हजार रुपये भरले. मात्र काही दिवसांत पलिकडून आलेला फोनच न लागल्याने आजींना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी सायबर पोलिसांत धाव घेतली आणि गुन्हा दाखल झाला.
याबाबत पोलिसांनी सांगितले की, गर्ग यांच्या तक्रारीनुसार त्यांना ३ एप्रिल २०२३ रोजी इंटरनॅशनल नंबरहून इंटरनेट कॉल आला. समोरील व्यक्तीने इंग्रजीत संवाद साधला, रॉयल बँकेतून बोलत असल्याचे सांगून तुमच्या पतीला लॉटरी लागली असल्याचे सांगितले.
श्रीमती गर्ग यांची फसवणूक झाल्याची तक्रार दाखल झाल्यानंतर तत्काळ बँकेत झालेले व्यवहार थांबवण्याकरिता बँकेला इ-मेल करण्यात आले आहे.संशयितांनी भारतातून कॉल करत परदेशातून कॉल केल्याचे भासवले. - रियाज शेख, वरिष्ठ निरीक्षक, सायबर पोलिस ठाणे