आठव्या भक्ती-शक्ती सायक्लोथॉनला उस्पूर्त प्रतिसाद

इन्डो अथलेटिक्स सोसायटीतर्फे निगडी ते लोणावळा अशी दरवर्षी घेण्यात येणारी १०० किलोमीटर सायकलिंग स्पर्धेला उस्फुर्त प्रतिसाद , संपूर्ण भारतातून १२०० हून आधीक जणांनी सहभाग घेतला. आरोग्य आणि क्रीडा क्षेत्रामध्ये असणारी अग्रगण्य संस्था इन्डो अथलेटिक्स सोसायटी यांच्यामार्फत दरवर्षी हा उपक्रम राबवण्यात आला. सदर स्पर्धेचे यंदा सातवे वर्ष होते. सर्व सहभागी सायकल सोबत सकाळी ५ वाजता भक्ती …

Update: 2023-12-06 06:48 GMT

इन्डो अथलेटिक्स सोसायटीतर्फे निगडी ते लोणावळा अशी दरवर्षी घेण्यात येणारी १०० किलोमीटर सायकलिंग स्पर्धेला उस्फुर्त प्रतिसाद , संपूर्ण भारतातून १२०० हून आधीक जणांनी सहभाग घेतला. आरोग्य आणि क्रीडा क्षेत्रामध्ये असणारी अग्रगण्य संस्था इन्डो अथलेटिक्स सोसायटी यांच्यामार्फत दरवर्षी हा उपक्रम राबवण्यात आला. सदर स्पर्धेचे यंदा सातवे वर्ष होते. सर्व सहभागी सायकल सोबत सकाळी ५ वाजता भक्ती शक्ती निगडी येथे जमले होते. यावेळी उद्योजक अण्णारे बिरादार, इंडियन मेडिकल असोसिएशनचे डॉ. विजय सातव, डॉ. दिलीप कामत, डॉ. सुहास माटे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पदाधिकारी श्री हेमंतजी हरहरे, क्रीडा भारतीचे मिलिंदजी डांगे , उन्नती सोशल फाउंडेशन चे संजय भिसे , आयएएस चे गजानन खैरे, अजित पाटील, गणेश भुजबळ त्याचप्रमाणे अरुण डेव्हलपर्सचे रामसरण गुप्ता आणि सनदी लेखापाल कृष्णलाल बंसल यांच्यातर्फे झेंडा दाखवून सुरुवात करण्यात आली.
भक्ती शक्ती सायक्लोथॉन दरवर्षी तीन प्रकारांमध्ये घेतली जाते. त्यात २० किमी भक्ती शक्ती ते देहूरोड , ५० किमी भक्ती शक्ती ते कान्हे फाटा , १०० किमी भक्ती शक्ती ते लोणावळा.

पुणे पिंपरी चिंचवड,अहमदनगर, नारायणगाव, उदगीर, सोलापूर तसेच महाराष्ट्राच्या विविध भागातून सायकल प्रेमींनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार करण्यात आला यामध्ये पुणे टू गुजरात प्रवास केलेले सुहास गदादे, संतोष झेंडे, शंतनू निगडे यांचा सत्कार पोलीस अधिकारी अजय दरेकर यांच्या हस्ते करण्यात आला तसेच पुणे टू कन्याकुमारी प्रवास केलेल्या सात जणांपैकी संदीप जी परदेशी आणि रणजीत सिंह, शंभरहून अधिक वेळा रक्तदान केलेले अभय खटावकर, आयर्न मॅन स्वप्निल चिंचवडे व अजय वाकडकर, पुणे ते केदारनाथ प्रवास केलेले स्वप्निल भुमकर ,राघवेंद्र बेनाडे यांचा देखील सत्कार करण्यात आला याप्रसंगी असा विविध राईट यशस्वीपणे पूर्ण करणाऱ्या अशा विविध सायकल प्रवास करणाऱ्या टींम चा सत्कार करण्यात आला. भगवती ज्वेलर्स तळेगाव यांनी तळेगाव येथे हायड्रेशनची उत्तम सोय केली होती तसेच एनर्जाल कंपनीने टेट्रा पॅक ची सोय सर्व सहभागी सायकलपटूंसाठी केली होती, समैरा औटी, शर्वरी जीवने दीड वर्षाच्या मुलीने आपल्या पालकांसह ते ७२ वर्षाचे श्रीपाद शिरोदे देखील भाग घेतला होता

भक्ती शक्ती सायक्लोथॉन चा नियोजना मध्ये इंडो ऍथलेटिक सोसायटी चा मोठया टीम चा सहभाग होता, त्यात गिरीराज उमरीकर , संदीप परदेशी, रमेश माने, श्रीकांत चौधरी, संतोष नखाते ,अमित नखाते , प्रतीक पवार, अमृता पाटील, सुधाकर टिळेकर, श्रेयश पाटील, प्रमोद चिंचवडे, अविनाश चौगुले, निकिता चौगुले, विवेक कडू, अनुप कोहले, प्रणव कडू, सुजित नाईक, रवी पाटील, संदीप लोहकर, अमित पवार, नितीन पवार, सुशील मोरे , रोहित जयसिंघानी , प्रशांत तायडे, योगेश तावरे, शैलेश पाटील ,चिन्मय पाटील, माधवन स्वामी , हरी प्रिया, अभिनंदन कासार, मदन शिंदे, मारुती विधाते, दीपक बुरुकुल तर कपिल पाटील यांनी सूत्रसंचालन केले.

Similar News

-->